गुलाबरावांच्या डोक्यातच दुष्काळ, संवेदनाहीन गुलाबना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? मनसेची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच नुकसान झाले असून शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजारांची मदत करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना फटकारले होते. राज ठाकरेंनी मागणी केली म्हणजे काय मोठं काम केलं नाही अस गुलाबराव पाटील यांनी म्हणल्यानंतर आता मनसेने पाटलांना जोरदार प्रत्युत्तर देत कडक शब्दांत टीका केली आहे.

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला. गुलाब चक्रीवादळामुळे समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते.राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे.पण संवेदनाहीन गुलाब ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार?भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ,असले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे अस अमेय खोपकर यांनी म्हंटल.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले होते-

राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. मागणी करणं सोपं आहे, मात्र निर्णय पंचनाम्यानंतर होईल. परिस्थिती पाहून दुष्काळ जाहीर केला जाईल. राज ठाकरे यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. कुणीही राजकारण करू नये,’ असं पाटील म्हणाले होते.