Tuesday, February 7, 2023

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?’ शालिनी ठाकरेंचा खोचक सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दीड वर्षानंतर आज राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या रूपाने अध्यक्षपद मिळाले. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी आज पदभर स्वीकारला. त्यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी रुपाली चाकणकर यांना खोचक टोला लगावला आहे. दीड ते दोन वर्षात मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?’ असे ठाकरे यांनी म्हंटले आहे.

रुपाली चाकणकर यांच्यावर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका करीत निशाणा सोडला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सरकार स्थापन होऊन दोन वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?, असा सवाल ठाकरे यांनी विचारला आहे.

- Advertisement -

दरम्यान, भाजप नेत्या चित्रा यांनी ट्विट करीत रुपाली चाकणकरांचे अभिनंदन केले आहे. 2 वर्षापासून भाजपनं दिलेल्या लढ्याला यश मिळालं. राज्य सरकारला महिला आयोगाला अध्यक्ष नेमण्यास अखेर मुहूर्त सापडला. अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती झाली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते, असे वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.