व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अब राजा का बेटा राजा नही बनेगा; राज- बाळासाहेबांच्या फोटोतून मनसेला नेमकं काय म्हणायचं??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या ट्विट ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अब राजा का बेटा राजा नही बनेगा अस ट्विट त्यांनी केलं आहे. यातून मनसेला नेमकं काय सुचवायचे आहे असा प्रश्न पडला आहे.

संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हॅंडल वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. या खाली त्यांनी अब राजा का बेटा राजा नही बनेगा… राजा वही बनेगा जो हकदार है अस म्हंटल आहे. संदीप देशपांडे यांनी या ट्विट च्या माध्यमातून अप्रत्यक्ष पणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्या नंतर मनसेच राजकीय वजन वाढल आहे. भाजपचे अनेक नेते थेट राज ठाकरेंच निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन त्यांची भेट घेत आहेत. तसेच शिंदे- फडणवीस सरकार मध्ये एकमेव आमदार असलेल्या मनसेला मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता आहे.