अश्लील चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप; बहाणे करुन छातीला, कंबरेला करायचा स्पर्श

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती मधिल नविन तयार झालेल्या रिम्स हास्पिटल मधिल सुरक्षा कंटाकदाराच्या अनेक तक्रारी तेथिल महिला कामगाराकडून ऐकायला येत होत्या. पगारासाठी महिलांना विविध प्रकारे त्रास देऊन त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न हा कंत्राटदार आणि त्याचे सहकारी करत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सदर कंत्राटदाराला चोप दिला.

ड्रेसचे मोजमाप घेण्याच्या नावाखाली महिलांना स्पर्श करणे, बहाणे करुन छातीला, कंबरेला स्पर्श करणे आणि विरोध करणाऱ्या महिलांना तक्रार केली म्हणून कामावरून काढून टाकणे, त्यांच्या पगार आणि पीएफ सुद्धा न दिनाचे हुकूमशाही करणे इथपर्यंत या विकृत प्रवृत्तीच्या लोकांची सर्रास प्रकार सुरू होता.

चाळे करणाऱ्या कंत्राटदाराला मनसेचा चोप; बहाणे करुन छातीला, कंबरेला करायचा स्पर्श

सदर कामावरून काढलेल्या महिलांनी मनसेचे शहराध्यक्ष गौरव बांते यांच्याकडे तक्रार करताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर कंत्राटदारास भर रस्त्यात चोप दिला आणि राजापेठ पोलिसांच्या सुपूर्द केला. यावेळी मनसे महिला शहराध्यक्ष शहर वृंदाताई मुक्तेवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Leave a Comment