‘मोदी गर्लफ्रेण्ड दो’, ‘मोदी बॉयफ्रेण्ड दो’ सिंगल तरुणांचा सोशल मीडियावर त्रागा! जाणून घ्या नवीन ट्रेण्डबद्दल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेसोबत देशात बेरोजगारीचे भीषण संकट उभं राहील आहे. उच्चशिक्षित असूनही अनेक तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीयेत. सरकारच्या अनेक विभागात नोकर भरती प्रक्रिया खोळंबली आहे. देशामधील बेरोजगारी दिवसोंदिवस वाढत असून या समस्येला कंटाळलेल्या अनेकांनी आता थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींकडेच नोकऱ्या देण्याची मागणी केलीय.

‘मोदी रोजगार दो’ हा हॅशटॅग रविवारपासून सोशल नेटवर्किंगवर ट्रेण्ड होताना दिसला. ट्विटरवर अनेकांनी हा ‘मोदी रोजगार दो’ हॅशटॅग वापरात रोजगार देण्याचं वचन दिलेल्या मोदींकडे नोकरीसाठी साकडं घातलं. ‘मोदी रोजगार दो’ हॅशटॅगचा सोशल मीडियावर वापर त्राहीमाम सारखा झाला. अशातच मंगळवारी मात्र सोशल मीडियावर मोदींच्या नावे दोन भलतेच हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये दिसले.

”मोदी बॉयफ्रेण्ड दो” आणि ”मोदी गर्लफ्रेण्ड दो” असे दोन हॅशटॅग ट्रेण्ड होत आहेत. हजारोच्या संख्येने नेटकऱ्यांनी हे हॅशटॅग वापरुन ट्विट केलेत. यावरून देशात बेरोजगारीसोबत देशातील सिंगल तरुण-तरुणींची संख्याही वाढत असल्याचं समजत आहे. त्यामुळं नोकरीसोबत सिंगल बेरोजगार तरुणांनी मोदींचे दार ठोठावले आहे. अनेकांनी यावर मजेदार मिम्सही शेअर केलेत.

योजनाच सुरु करा...

ट्रेण्ड पाहून सिंगल पोरं

आत्मनिर्भर व्हा...

नका करु हे असं....

शब्बास...

ट्रेण्डमध्ये पण फरक आहे. ही समानता आहे का?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment