भारत जळत असताना मोदी वाद्य वाजवण्यात मग्न; इतिहास याची नोंद घेईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. अशा परिस्थितीत देशात कोरोना काळात परिस्थितीचे गांभीर्य न ओळखल्याने राजकीय नेत्यांसह अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. देशात कोरोना परिस्थिती गंभीर बनली असताना देशात निवडणूक रॅली सभा मोठ्या प्रमाणात घेण्यात आल्या. यात भाजप पक्ष आग्रस्थानावर दिसले मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांना खच्चून गर्दी झाल्याचे फोटो व्हायरल झाले. आता मात्र देशातील कोरोना स्थिती बिकट झाली आहे रोज ३ लाखांच्या घरात रुग्ण सापडत आहेत. या सर्व परिस्थितीत सोशल मीडियावर आसामच्या कोक्राझाड जिल्ह्यातील एका सभेतील मोदींचा फोटो व्हयरल होत असून ‘भारत जळत असताना मोदी वाद्य वाजवण्यात मग्न’ असल्याची टीका नेटकऱ्यानी केली आहे.

मोदींची निरो फिडलशी तुलना

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल २०२१ रोजी आसामचा दौरा केला होता आसामच्या कोक्राझाड जिल्ह्यातील एका सभेतील हा फोटो आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यानी मोदींची तुलना निरो फिडेलशी केली आहे. रोम जळत असताना निरो फिडल वाद्य वाजवीत बसला होता, असे बोलले जाते. अशाच प्रकारची असंवेदनशीलता मोदींनी दाखवली असल्याचे नेटकऱ्यानी म्हंटले आहे. दिनांक 1 एप्रिल या काळात कोरोना नियंत्रणावर प्लानिंग झालं असतं तर देशावर ही परिस्थिती असली नसती. या फोटोवरुन मोदींचा बेफिकीर पणा दिसून येतेय.

“रोम जळत असताना निरो फिडल वाद्य वाजवीत बसला होता.अन् आज भारत जळत असतांना आपले हे दलिंदर महाशाय सुद्धा वाद्य वाजवत बसलेत याची इतिहास नक्कीच नोंद घेईल ” असे श्रीराम गरड याने म्हंटले आहे.

https://www.facebook.com/100013874105385/posts/1153110391828087/

“देशात लाखो चिता जळत असतांना निवडणूक प्रचारात हात हलवत फिरणारा आधुनिक निरो’ असे निलेश बोदडे पाटील याने म्हंटले आहे.
https://www.facebook.com/100002159356599/posts/3916243565124250/

“रोम जळत होता तेव्हा निरो बासरी वाजवत होता म्हणतात.फोटोतील व्यक्तीशी साम्य आढळून आल्यास तो फक्त योगायोग समजावा”असे प्रसाद घाटगे याने म्हंटले आहे.
https://www.facebook.com/100003268491054/posts/3861599380625640/

१ एप्रिल रोजी प्रसारित देशातील कोरोना आकडेवारी

देशात तब्बल 72,330 नव्या कोरोनाबाधित रुग्नांची भर पडली आहे. ही बाब चिंता वाढवाणारी ठरत आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्नांची संख्या 40,382 इतकी आहे. तर कोरोनामुळे 459 रुग्णांना आपला जीव गमावावा लागला आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 1,22,21,665 इतकी झाली. 1,14,74,683 लोक करोनातून बरे झाले होते . देशात १ एप्रिल पर्यंत कोरोनाच्या 5,84,055 इतके ऍक्टिव्ह रुग्ण होते. तर एकूण 1,62,927 रुग्ण कोरोनामुळे दगावले होते.

Leave a Comment