हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा 22 नोव्हेंबर ला उत्तरप्रदेश येथे एका कार्यक्रमानिमित्त जाणार असून सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर या भागातील एका अपार्टमेंट मधील लोकांना चक्क कपडे वाळत न घालण्याचे फर्मान पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्याबाबतचे थेट पत्र पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.
पंतप्रधान गोमतीनगर पोलीस मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या भागामधील कार्यक्रमस्थळी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने या भागामधील सर्व उंच इमारतील आणि टॉवर्सला सूचना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सरस्वती अपार्टमेंटमध्ये मधील लोकांना 4 दिवस कपडे वाळत घालू नका अशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.
Don’t dry your clothes on the balcony. Modiji is passing by. pic.twitter.com/x8NBEtgRN4
— Rohini Singh (@rohini_sgh) November 18, 2021
गोमतीनगर सेक्टर चारमधील सरस्वती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्व रहिवाश्यांना सूचति करण्यात येत आहे की, १९ नोव्हेंबर २०२१ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान बाल्कनी किंवा बाल्कनीच्या आजूबाजूला (खिडक्यांमध्ये) कुठेही कोणत्याही प्रकारची कपडे किंवा इतर गोष्टी लटकवू नका. तसेच या कालावधीमध्ये एखादी नवीन व्यक्ती तुमच्या इमारतीमध्ये वास्तव्यास आल्यास त्यासंदर्भातील माहिती तातडीने पोलीस स्थानकामध्ये कळवावी, असं पोलिसांनी या पत्रात म्हटलंय