BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यावेळी आयपीएलच्या मीडिया राईट्समुळे बीसीसीआयची (BCCI) कमाई 46 हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आता बीसीसीआयने (BCCI) माजी क्रिकेटपटू आणि अंपायर्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. माजी खेळाडू आणि अंपायरच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा बीसीसीआयने केली. या निर्णयामुळे पेन्शन जास्तीत जास्त 70 हजार रुपयांपर्यंत जाणार आहे.

आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक गरजांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. खेळाडू कायमच महत्त्वाचे असतात, निवृत्तीनंतरही त्यांची देखभाल केली गेली पाहिजे, हे बोर्डाचं कर्तव्य आहे. तसंच अंपायरही खेळासाठी महत्त्वाचे आहेत, बीसीसीआयला (BCCI) त्यांच्या योगदानाची जाणीव आहे, असं बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी हा निर्णय जाहीर करताना म्हंटले आहे.

खेळाडूंना पेन्शन द्यायच्या निर्णयाची घोषणा होताच माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने ट्वीट करून बीसीसीआयचं अभिनंदन केलं आहे. ‘माझे वडील 60 प्रथम श्रेणी मॅच खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी 3 हजार रन केले, 5 शतकंही केली. पैसे नव्हता तरीही त्यांच्या पिढीने या खेळाला पुढे घेऊन जाण्यात मदत केली. त्यांच्या या योगदानाची आठवण बीसीसीआयने (BCCI) ठेवली आणि मोठं मन दाखवलं,’ असे ट्विट मोहम्मद कैफने केले आहे. याशिवाय कैफने ‘थँक्स बीसीसीआय, हे सेवानिवृत्त खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचं आहे. माझे वडील मोहम्मद तारिफ पेन्शन मिळाल्यानंतर कायमच खूश होतात. पैसे सुरक्षा देतात, ओळख तुम्हाला गौरव मिळवून देते.’ असे लिहिले आहे.

कशा प्रकारे मिळणार पेन्शन
प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेल्या ज्या खेळाडूंना आधी 15 हजार रुपये पेन्शन मिळत होती, त्यांना आता 30 हजार रुपये मिळतील. तर 37,500 रुपये मिळाणाऱ्या माजी टेस्ट खेळाडूंना 60 हजार रुपये आणि 50 हजार मिळणाऱ्यांना 70 हजार रुपये मिळणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ज्यांना आतापर्यंत 30 हजार रुपये मिळायचे, त्यांना आता 52,500 रुपये तर 2003 साली संन्यास घेणाऱ्या आणि 22,500 रुपये मिळवणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता 45 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

हे पण वाचा :
2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

Moosewala Murder Case : सौरभ महाकाळनंतर आता संतोष जाधवला पुणे पोलिसांकडून अटक

T20 World Cup मध्ये भारताचा ‘हा’ खेळाडू खेळाडू ठरू शकतो गेम चेंजर! गावसकरांची भविष्यवाणी

7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या? गूढ कायम

Cristiano Ronaldoची ‘त्या’ 13 वर्षे जुन्या खटल्यातुन निर्दोष मुक्तता

Leave a Comment