व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक! मुंबईतील एक हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत सापडला खासदाराचा मृतदेह

मुंबई । दादरानगर-हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह मरीन ड्राइव्हच्या एका हॉलेलमध्ये मिळाला. पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे.  मोहन डेलकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे. खासदार डेलकर यांच्याजवळ गुजरातीत लिहिलेली एक चिठ्ठी आढळल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांचा घटनास्थळी तपास सुरू आहे. पण खासदाराच्या अशा मृत्यूने देशात खळबळ उडाली आहे.

मोहन डालकर दादरा-नगर हवेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. 58 वर्षांचे डेलकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले.

त्यानंतर सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर हे काँग्रेस, भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष यांच्या तिकीटावर खासदार झाले होते. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.