BMC च्या नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग, 22 वर्षीय तरुणाला पालघरमध्ये अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या कोरोनाच्या संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिवस रात्र रुग्णांची सेवा करावी लागत आहे. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास उशीर होत आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये ड्युटी संपल्यानंतर ट्रेनने घरी परतणाऱ्या BMC च्या नर्सचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपीने धावत्या ट्रेनमध्ये या तरुणीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून या घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

पीडित तरुणी नर्स रविवारी रात्री आपले काम संपवून डहाणू येथील आपल्या घरी निघाली होती. या तरुणीने रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी विरारहून सुटणारी शेवटची ट्रेन पकडली होती. या दरम्यान वाणगाव रेल्वे स्थानकावरून आरोपी तरुण या महिला डब्यात शिरला. यानंतर त्याने नर्सच्या हातातील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नर्सने प्रसंगावधान दाखवत आरोपीशी प्रतिकार करत आपला मोबाईल परत मिळवला.

यानंतर आरोपीने धावत्या ट्रेनमध्ये नर्सचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. डहाणू स्टेशन येताच पीडित नर्सने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण तोपर्यंत आरोपी तिकडून फरार झाला होता. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पीडित तरुणीने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. तिने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी पाठलाग करत आरोपीला पकडले. या तरुणावर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात चोरी आणि विनयभांगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश देवरे करत आहेत.

Leave a Comment