Money Laundering Case : अखेर जॅकलिनची ED ला कबुली; सुकेशने दिली ‘ही’ महागडी गिफ्ट्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ईडीच्या रडारावर असून 200 कोटींच्या फसवणुकी प्रकरणातील तिची चौकशी अजूनही सुरूच आहे. ED ने केलेल्या चौकशीदरम्यान जॅकलिनला सुकेशने Gucci, Chanel च्या ब्रँडेड हँड बॅगसह अनेक महागडे गिफ्ट्स दिल्याची कबुली दिली आहे. येव्हडच नव्हे तर त्याने जॅकलिनसाठी प्रायव्हेट जेट आणि हेलिकॉप्टर राईड देखील बुक केले होते.

जॅकलिनने ED ला सांगितले की,” डिसेंबर 2020-जानेवारी 2021 मध्ये सुकेशने तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यादरम्यान तिने त्याच्या कॉलला उत्तर दिले नाही.” जॅकलिनच्या मते, शेखर रत्न वेला नावाच्या व्यक्तीने तिच्याशी संपर्क साधून सुकेशशी बोलण्यास सांगितले. जॅकलिनने पुढे सांगितले की”त्याने आपण जयललिता यांच्या राजकीय कुटुंबातील असून Sun TV चा मालक असल्याचे सांगितले. तसेच तो चेन्नईचा असल्याचेही म्हंटले.” जॅकलिन म्हणाली की,” तो माझा खूप मोठा फॅन आहे आणि मी साऊथचे चित्रपट करावेत. तसेच Sun TV चा मालक असल्याने त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तेव्हापासूनच आम्ही संपर्कात होतो.”

गिफ्ट्सबाबत जॅकलिनने पुढे सांगितले की, सुकेशने तिला लिमिटेड एडिशन परफ्यूम दिले आहेत. तसेच दर आठवड्याला वीन अल्कलाइन पाण्याच्या बाटल्या, दररोज वेगवेगळ्या ठिकाणची फुले, चॉकलेट्स, Gucci, Chanel च्या तीन डिझायनर बॅग, जिम वेअरसाठी दोन Gucci आउटफ‍िट्स, Louis Vuitton शूज, डायमंड इअरिंग्जच्या 2 जोड्या, मल्टी कलर्ड स्टोन ब्रेसलेट, दोन Hermes ब्रेसलेट, तिच्या घरासाठी एक मिनी कूपर कारही मिळाली मात्र सुकेशने ती परत घेतली.

https://www.instagram.com/p/CYdufJbBCN8/?utm_source=ig_embed&ig_rid=ab7e4a96-781a-40b3-a366-f0b21e422afb

“ती सुकेशला कधी वैयक्तिकरित्या भेटली होती का.? असा प्रश्न ED ने विचारल्यानंतर जॅकलीन म्हणाली- “सुकेश खूप दुःखी होता आणि त्याच्या काकांच्या निधनाने खूप उदासही होता. त्याने मला चेन्नईत त्याच्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यास सांगितले.”यानंतर त्याने मला मुंबईहून चेन्नईला आणण्यासाठी एक प्रायव्हेट जेट पाठवला. यावेळी स्वतः न येत त्याने आपल्या एका असिस्टंटला पाठवले होते. मी हयात हॉटेलला पोहोचले आणि तासाभराने सुकेशही तिथे पोहोचला. नंतर आम्ही जेवण करून लिव्हिंग रूममध्ये गप्पा मारल्या. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलवर परत आला आणि नाश्ता ऑर्डर केला. नाश्ता करून त्याने मला विमानतळावर सोडले. मी खाजगी जेटने मुंबईला परत आले.”

Leave a Comment