Wednesday, March 29, 2023

धक्कदायक ! देव बनण्याच्या नादात पुजाऱ्याने उचलले ‘हे’ पाऊल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आजकाल कोण अंधविश्वासाला कधी बळी पडेल याचा काही नेम नाही. बरेचशी लोकं अजूनही अंधविश्वासावर भरोसा ठेवतात. एखाद्याच्या मनात अंधविश्वासाने घर केले तर काय चूक काय बरोबर हे त्याचे त्याला कळत नाही. अशीच एक घटना थायलंडमध्ये घडली आहे. यामध्ये थम्माकरोण वंगपरीचा या व्यक्तीने आरीने स्वत:चा गळा चिरला आहे. त्याचे असे म्हणणे होते कि जर त्याने त्याचं शिर कापलं तर तो देवाचा अवतार घेईल. हि घटना १५ एप्रिल रोजी घडली आहे. थायलंडच्या नोंग बुआ लम्फू प्रांत मंदिरात थम्माकरोणचा मृतदेह आढळून आला होता. थम्माकरोण वाट फु हिन मंदिराचा पुजारी होता. त्याने मंदिराच्या परिसरात एका मोठ्या आरीने आपला गळा चिरला. त्याच्या मनात अशी अंधश्रद्धा निर्माण झाली होती कि अशाप्रकारे स्वत:चा बळी दिला कि तो देव बनेल.

पाच वर्षापासून सुरू होतं प्लॅनिंग
लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, थम्माकरोण हे ५ वर्षांपासून याची तयारी करत होते. त्यांनी अनेक लोकांना या बाबतीत माहितीसुद्धा दिली होती. सर्वाना असे वाटत होते कि पुजारी मस्करी करत आहे. त्यामुळे कुणालाही याचा अंदाज नव्हता कि पुजारी असे काहीतरी करतील. त्यानंतर जेव्हा थम्माकरोणचा मृतदेह आढळला तेव्हा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

- Advertisement -

पुढील जन्मात देव होणार
पुतण्याने सर्वात आधी थम्माकरोणचा मृतदेह पहिला. फ्लोरवर रक्तच रक्त पसरले होते. थम्माकरोणने मरताना एक चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीवरून या गोष्टीचा उलघडा झाला आहे. यामध्ये थम्माकरोणने गेल्या पाच वर्षांपासून तो या कामाची तयारी करत होता.मृत्यूनंतर तो आता देवाच्या रूपात जन्म घेणार आहे असे लिहिले आहे. थम्माकोरण गेल्या ११ वर्षापासून या मंदिराचा पुजारी होता.