मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या परिस्थिती पावसाळ्याच्या आगमनासाठी अनुकूल बनली आहे. मात्र, यापूर्वी ५ जून रोजी मान्सून केरळला पोहोचणार असल्याचे सांगितले जात होते.

स्कायमेटने दावा केला आहे की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे. मागीच्या वर्षी, आठ दिवसांच्या विलंबानंतर ८ जूनला मान्सून केरळ किनारपट्टीवर धडक दिली होती. भारतात जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मॉन्सूनपासून पाऊस पडतो. हवामान खात्याने एप्रिलमध्ये सांगितले होते की, यावेळी मान्सून सरासरी राहणार आहे.

 

विभागाच्या मते, ९६ ते १००% पाऊस हा सामान्य मान्सून मानला जातो. साधारणपणे १ जून रोजी केरळ किनारपट्टीवर धडक दिल्यानंतर ५ जून रोजी गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आसाम आणि ईशान्य या राज्यात मान्सून पुढे सरकू शकतो.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १० जून रोजी मान्सून महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये प्रवेश करू शकेल. याशिवाय १५ जूनला गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि बिहारमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या उत्तरेकडील भागात मान्सून २० जूनला तडाखा देऊ शकेल.

मात्र, २५ जूनपर्यंत उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात आणि हिमाचलमध्ये मान्सून पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच जून अखेरिस उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मान्सूनचा अंतिम प्रवेश राजस्थान, पंजाब आणि हरियाणा येथे होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ३० जूनपर्यंत मान्सून या राज्यांमध्ये दाखल होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment