औरंगाबाद । बुधवारी (दि. 31 मार्च) लॉकडाऊन धुडकावत खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र हा मोर्चा पोलिसांनी अडविला, तर गुरुवारी (दि. १ एप्रिल) रस्त्यावर उतरू. तसेच जो पर्यंत मोर्चा यशस्वी होत नाही, तो पर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहतील असा इशारा आज खा. जलील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. याच विषयावर खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांचा विचार केला गेला नाही. त्याच बरोबर जिल्ह्यातील रुग्णालयात 2000 जागा रिक्त असल्याचा आरोप करीत सरकार विरोधात मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले होते.तेंव्हा पासून शहरात मोर्चा बाबत एकाच चर्चा सुरू आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थिती आणि लॉक डाऊन बाबत लोक प्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या कडून खा.जलील यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र बैठक संपल्यावर जलील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता, मोर्चा काढण्याच्या भूमिकेवर ते ठाम असल्याचे मत व्यक्त करीत 31 मार्चला मोर्चा काढणार आहे. जर पोलीस प्रशासनाकडून अडविण्याचा प्रयत्न झाला, तर 1 एप्रिलला रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला. जोपर्यंत मोर्चा यशस्वी होत नाही, तो पर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू असा इशारा देण्यात आला. बंद दरम्यान औद्योगिक वसाहती देखील बंद कराव्यात कामगारांच्या जीवाशी प्रशासनाने खेळू नये असे देखील जलील म्हणाले.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/451858219573063
तर लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या भूमिका आणि कायधाची सांगड घालून काम करावे . खासदार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांच्या मागण्याचा नक्कीच विचार केला जाईल. आमचं म्हणणं ते मनातील अशी अपेक्षा व्यक्त करीत. जो कोणी कायदा मोडेल त्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्पष्ट केले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा