Sunday, June 4, 2023

पार्कमध्ये फिरताना एका महिलेवर 100 पेक्षा जास्त उंदीरांनी केला हल्ला, तिच्या हातापायांना कुरतडले

लंडन । युके येथे राहणाऱ्या एका ब्रिटीश महिलेने असा दावा केला आहे की, तिच्यावर 100 हून अधिक उंदीरांनी हल्ला केला होता. या महिलेचे म्हणणे आहे की, एका पार्कमध्ये फिरत असताना उंदीरांनी तिच्यावर हल्ला केला आणि तिचे हात पाय कुरतडल. या महिलेने लोकांना रात्रीच्या वेळी पार्कमध्ये न जाण्याची सूचना केली आहे.

‘द सन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, लंडनमध्ये राहणाऱ्या 43 वर्षीय सुझान ट्रेफ्टब 19 जुलै रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ईलिंगच्या नॉर्थफिल्ड्समधील ब्लॉन्डिन पार्कमध्ये फिरत होत्या. मग त्यांची नजर खाली गवतात फिरत असलेल्या शेकडो उंदीरांकडे गेली. एकाच वेळी इतके उंदीर पाहून सुझान घाबरून गेली. पार्क सोडण्यापूर्वी उंदरांनी तिच्यावर हल्ला केला.

रिपोर्ट नुसार सुझान म्हणाली,”मी इतके उंदीर एकाच वेळी कधीच पाहिले नाहीत. ते 100 पेक्षा जास्त असू शकतात. मला असे वाटले की, मी आजारी पडणार आहे. माझ्या पायावर उंदीर रेंगाळत होते. मी त्यांना माझ्या पायाने लाथ मारत होते. अंधारामुळे उंदीर कोठून आले हे पाहणे कठीण होते. उंदीर माझ्या पायावर कुरतडत होते आणि माझ्या शरीरावर चढण्याचा प्रयत्न करीत होते.”

सुझान पुढे म्हणाली की,”अपघाताच्या दिवशी मला कोणाकडे मदत मागितली पाहिजे ते समजू शकले नाही. अशा प्रकाराच्या हल्ल्याबद्दल बोलताना मी कुणाला ऐकले नव्हते. मला सर्वांना सांगायचे आहे की, रात्रीच्या वेळी पार्कसारख्या ठिकाणी जाणे टाळा.”

त्याच वेळी, इलिंग कौन्सिलच्या प्रवक्त्याने सांगितले की,” पार्क्समधील घाण आणि जनावरांसाठी उरलेले अन्न सोडल्यामुळे उंदीर सामान्यत: उद्यानात येतात. म्हणूनच लोकांनी येथे अन्नाच्या वस्तू फेकून देऊ नये कारण असे उरलेले अन्न देखील उंदीरांना आकर्षित करते.”