सातारा | सातारा शहरात अज्ञात व्यक्तीने कुत्र्यांच्या उपद्रवाला कंटाळून अन्नातून 30 हून अधिक कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे. विष बाधेतून हा प्रकार झाल्याचा संशय प्राणीमित्रांकडून केला आहे. या घटनेने प्राणीप्रेमी मधून संताप व्यक्त केला जात आहे. वुई केअर या प्राणीमित्र संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी पाहणी करून कुत्र्यांवर उपचार केलेले आहेत.
प्राणीप्रेमी जास्मिन अफगाण म्हणाल्या, राजवाडा चौपाटी नजीक आळूचा खड्डा परिसरात मृत कुत्री आढळून आलेली आहेत. त्यामध्ये काही कुत्री मृत्यू झाल्याचे आढळून आले. मंगळवार तळे येथेही कुत्र्याबाबतचा असाच प्रकार दोन दिवसापूर्वी घडलेला आहे. कुत्र्यांची सद्यस्थितील प्रकार हा पूर्ण तयारीनिशी केल्याचे दिसून येत आहे. अनेक कुत्र्यांच्या तोंडातून फेस येत असल्याने त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातारा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. पालिकेने संबंधित कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. आज या घडलेल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी प्राणीप्रेमीकडून केली जात आहे.