चक्क आरटीपीसीआर’च्या टेस्ट ट्यूबमध्ये आढळला डास!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

   औरंगाबाद :  कोविड चाचणीसाठी गेलेल्या नागरिकाला दिलेल्या नमुना टाकण्यासाठीच्या टेस्ट ट्युब मधील द्रवात डास आढळला. अशा प्रकारामुळे चाचणीचे वेगळे परिणाम किंवा दोष येण्याची शक्यता नागरिकाने व्यक्त केली. हा प्रकार महापालिका कम्युनिटी हॉल, सिडको एन-दोन येथील चाचणी केंद्रावर गुरुवारी (ता. १७) घडला.

सिडको एन-तीन येथील अभ्यासिका चालवणारे अक्षय गोयल हे कम्युनिटी हॉल सिडको एन-2 येथे कोविड चाचणीसाठी गेले होते. तेथे त्यांची ‘आरटीपीसीआर चाचणी करायची असल्याने त्यांना नमुना जतन करण्यासाठीची बाटली (टेस्ट ट्यूब) आरोग्य सेवकाने दिली. यावेळी या बाटलीतील पिवळ्या द्रवात त्यांना डास दिसून आला, हे पाहून श्री. गोयल यांनी हा प्रकार आरोग्य
सेवकाला सांगितला. सेवकाने चुकीने आल्याचे सांगत तातडीने त्यांना दुसरी बाटली दिली.

यावर श्री. गोयल यांनी सांगितले की, चाचणी साठीच्या द्रवात नाकातील आणि लाळेतील द्रव जतन करण्यासाठी ठेवण्यात येतात. परंतू डास आढळणे हे धोक्याचे आहे. यामुळे संभाव्य चाचणीत दोष आढळू शकतात. ‘माझ्यासोबत हा प्रकार घडला. मी वेळीच लक्ष दिले म्हणून ठिक आहे. परंतू इतरांसोबत असे प्रकार घडू नयेत.’

Leave a Comment