‘हा’ आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी। विधानसभा निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. आता पर्यंत महाराष्ट्रातील सर्वच उमेदवारांचे निवडणूक उमेदवारी अर्ज भरून झाले आहेत. दरम्यान, या उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांची संपत्तीची माहिती आता समोर आली आहे. त्यातुन महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? असा प्रश्न पडणे सहाजिक आहे. तेव्हा या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपचे उमदेवार पराग शाह हे विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. पराग शाह यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचं विवरण दिलं आहे. त्यानुसार त्यांची संपत्ती अंदाजे ५०० कोटी इतकी आहे. भाजपनं राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून सध्या नगरसेवक असलेले पराग शाह यांना घाटकोपर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

पराग शाह यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात यात त्यांच्या पत्नीच्या नावावरील संपत्तीचा ही समावेश आहे. ५० वर्षीय शाह यांनी व्यवसाय व गुंतवणूक हे आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून दाखवले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ७८ कोटींची स्थावर तर, ४२२ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शाह पती-पत्नीच्या नावावर तब्बल २९९ कोटींचे शेअर्स आहेत. तर, व्यावसायिक, निवासी, कृषी व बिगरकृषी अशा १० स्थावर मालमत्ता आहेत. महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावे शेतजमीन आहे. त्यांच्याकडं २ कोटी ६ लाखाचे दागदागिने आहेत. ९ लाखांची स्कोडा कार आणि २ कोटी ४७ लाखांची फेरारी गाडी आहे.

Leave a Comment