Monday, February 6, 2023

मायलेकरांचा मृ्त्यू : वीजेची तार तुटून आईच्या अंगावर पडल्याने चिमुरडा वाचवायला गेला होता, चिमुकली बचावली

- Advertisement -

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बाचणी येथील माय लेकरांचा अंगावर उच्च विद्युत वाहिनीची तार खांबावरुन तुटून पडल्याने शॉक लागून मृत्यू झाला. तर घाबरलेली बारा बर्षाची चिमुरडी सुदैवाने बचावली आहे. गीता गौतम जाधव (वय- 32) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय- 14) असे मृत्यु झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. घाबरलेल्या चिमुरडीमुळेच घटनेची माहिती समजली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गीता जाधव आपल्या दोन मुलांसह मंगळवारी दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता घराच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे कपडे धुण्यास गेल्या होत्या. काम उरकल्यानंतर ऊसाच्या शेतातून माघारी परतत असताना विजेची उच्च दाबाची विद्युत खांबावरील प्रवाहीत तार तुटून गीता यांच्या अंगावर पडली. यावेळी आईला वाचवण्यास गेलेला 14 वर्षाचा मुलगा हर्षवर्धन गौतम जाधव याला जोराचा शॉक बसला. या दुर्घटनेत माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

सदर घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दतात्रय नाळे यांनी घटनेची पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे करत आहेत.