आधी पोटच्या मुलांची हत्या; मग गळफास घेत महिलेची आत्महत्या

लखनऊ : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेत एका 25 वर्षीय महिलेने आपल्या दोन मुलांची हत्या केली आहे. एवढेच नाहीतर या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं वय 5 वर्ष तर मुलाचं दीड वर्ष होतं. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोनी बॉर्डर परिसरातील उत्तरांचल कॉलनीत राहाणाऱ्या 25 वर्षीय प्रिया दहियाने 18 जुलै रोजी सायंकाळी आपल्या पाच वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर तिने आपल्या 1 वर्ष 6 महिन्याच्या मुलाचीही गळा दाबून हत्या केली. आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतल्यानंतर प्रियाने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तिघांनाही दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल केले. मात्र या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.

या महिलेने अचानक उचलेल्या या पावलाने सगळेच जण हैराण झाले आहेत. या घरामध्ये पती-पत्नी आणि मुलांशिवाय दुसरं कोणीच राहत नव्हतं. यादरम्यान प्रियानं आपल्या दोन मुलांचा जीव घेत स्वतःही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध पोलीस घेत आहेत. तिने अचानक हे पाऊल का उचलले हे अजून समजू शकले नाही.

You might also like