Saturday, March 25, 2023

हैदराबादमध्ये जावयाने केला सासूवर बलात्कार

- Advertisement -

दिल्ली प्रतिनिधी । काही दिवसांपूर्वी पशुवैद्यकीय महिवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर हैदराबाद सह संपूर्ण देश हादरला होता. यानंतर त्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला होता. दरम्यान ही घटना ताजी असतानाच हैदराबादमध्ये पुन्हा एक अशीच अप्रिय घटना घडली आहे.
या घटनेत एका नाराधमाने आईसमान सासूला आपल्या वासनेची शिकार केले आहे. या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी या घटनेतील जावयाला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादेतील पंजागट्ट पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 48 वर्षीय पीडितेने शुक्रवारी तिच्या जावयाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. पीडित महिला एका अपार्टमेंटमध्ये मुलगी आणि जावयासोबत राहते.
दारूच्या नशेत जावयाने बलात्कार केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना घडली तेव्हा पीडित महिला घरात एकटी होती. आरोपी जावयाने याचा फायदा घेऊन सासूला वासनेची शिकार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरुद्ध भादंवि कलम 376 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र आरोपीचे नाव पोलिसांनी गोपिनीय ठेवले आहे.