कंपनीत काम करताना आईने गमवले हात; चिमुकल्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कंपनीत काम करत असताना एका 19 वर्षीय कामगार महिलेचा हात मशीन मध्ये गेल्यामुळे हाताची चार बोटे कापली गेली आहेत. ही महिला विवाहित असून तिला 11 महिन्याची एक छोटी मुलगी आहे. त्यामुळे सीड सेफर कंपनीमध्ये कायमस्वरूपी करण्याची मागणी कामगार महिलेने केली आहे.

पूजा परशुराम नागुलकर वय (19) असे हाताची बोटे कापलेल्या महिलेचे नाव आहे. रांजणगाव जोगेश्वरी येथील सीड सेफर या कंपनीमध्ये काम करत होती. या कंपनीमध्ये दीपक बडे यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे.13 तारखेला सीडस एफर कंपनीमध्ये काम करत असताना तिचे कंपनीच्या मशीन मध्ये हात गेल्याने समोरची चार बोटे कापल्या गेली. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. कामगार महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तिच्यावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत.

“माझ्या हाताची बोटे गेल्यामुळे दुसऱ्या कंपनीमध्ये काम मिळणार नाही. माझ्या परिवारातील सर्व सदस्य कंपनीमध्ये काम करून उदरनिर्वाह भागवत असतात. मला अकरा महिन्याची मुलगी असून माझ्या परिवारासह मुलीच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कंपनीमध्ये कायमस्वरूपी करण्याची मागणी कामगार महिलेने हॅलो महाराष्ट्रशी बोलताना केली आहे”.

Leave a Comment