Thursday, March 30, 2023

कोयना नदीमध्ये उडी घेऊन पोटच्या दोन मुलांसह आईची आत्महत्या

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी । पोटच्या दोन मुलांसह एका महिलेने कोयना नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पाटण तालुक्यातील सांगवड येथे ही घटना घडली आहे. राधिका माने वय २७ असे या विवाहित महिलेचे नाव आहे. तर श्रावण वय ३ वर्षे आणि शिवराज वय ९ महिने अशी तिच्या मुलांची नावे आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान राधिका यांचे सासर हे म्हसवड तालुक्यातील माण येथे आहे. तर सांगवड तालुका पाटण हे त्यांचे माहेर आहे. काही दिवसांपूर्वी त्या माहेरी आल्या होत्या. मात्र त्यांनी शुक्रवारी आपल्या माहेरी पोटच्या नऊ महिने आणि तीन वर्षाच्या दोन मुलांनासह कोयना नदीत उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने घटनास्थळी गर्दी केली.

- Advertisement -

तसेच काही नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांचा कसून शोध घेतला असता नऊ महिने वयाच्या बालकाचा मृत्यूदेह केवळ कोयना नदीत सापडला. मात्र आई आणि ३ वर्षे वयाच्या मुलाचा शोध अजून हि सुरू आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर पाटण पोलीस या घटनेचा तपास आणि माय लेकरांचा शोध घेत आहेत.