व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दहा दिवसांच्या मुलीला आईनं अंथरुणात गुंडाळले,अंगावर विटा दाबून जिवे मारणार; तेवढ्यात…

लखीसराय : वृत्तसंस्था – बोलतात ना आईच्या मायेची तुलना करता येत नाही. आईसारखं दैवत संपूर्ण जगात नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असे म्हणतात. पण बिहारच्या लखीसरायमध्ये आई आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका आईने आपल्या पोटच्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

लखीसरायच्या कवैया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पंजाबी मोहल्ल्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या नवजात मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे चिमुकल्या मुलीचा जीव वाचला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या नवजात बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. पंजाबी मोहल्ल्यात वास्तव्यास असलेल्या अशोक यादव यांची पत्नी लक्ष्मी देवी उर्फ ऋचा देवी हिने स्वतःच्या लहान मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे याच परिसरात राहणाऱ्या आशा देवी यांनी सांगितले आहे.

‘लक्ष्मी देवीनी १० दिवसांपूर्वी घरातच एका मुलीला जन्म दिला. शनिवारी संध्याकाळी तिनं मुलीला अंथरुणात गुंडाळले आणि तिला विटांनी दाबले. त्याचवेळी मोहल्ल्यातल्या काही महिलांनी तिला पाहिले असे आशा देवी यांनी सांगितले. स्थानिक महिलांना हा सगळा प्रकार पाहून धक्काच बसला. त्यांनी महिलेला हि हत्या करण्यापासून अडवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी नवजात बालिकेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर मी मुलीला मारत नव्हते असा दावा लक्ष्मी देवी हिने केला आहे.