Moto G62 5G : 5000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा; Motorola च्या स्मार्टफोनची जोरदार चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola कंपनीचा नवा (Moto G62 5G) स्मार्टफोन मोटो G62 5G लवकरच भारतीय बाजारपेठेत ऊपलब्ध होणार आहे. 5,000mAh ची दमदार बॅटरी असलेला हा मोबाईल फोन सर्वसामान्यांना परवडणारा आहे. आज आपल्या मोबाईल रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या स्मार्टफोन मध्ये कोणकोणत्या खास गोष्टी आहेत…

6.5 इंचाचा डिस्प्ले-

मोटो G62 5G स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.5-इंचाचा फुल HD + IPS डिस्प्ले आहे. यात Adreno 619 GPU आणि 4 GB रॅम आहे. याशिवाय यामध्ये पॉवरसाठी (Moto G62 5G) Snapdragon 480 Plus SoC उपलब्ध आहे. फोनमध्ये 128GB इनबिल्ट स्टोरेज असून ते मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोन मध्ये GPS, Bluetooth, Wi-Fi आणि OTG सारखे फीचर्स देखील आहेत. तसेच सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.

Moto G62 5G

5000mAh ची दमदार बॅटरी- (Moto G62 5G)

या स्मार्टफोन मध्ये 5G, NFC आणि USB Type-C कनेक्शन देण्यात आले आहे. डिव्हाइसमध्ये विविध प्रकारचे नेटवर्किंग फीचर्सही देण्यात आले आहेत. याशिवाय फोनचा फिंगरप्रिंट सेन्सर एका बाजूला ठेवला आहे.  या मोबाईल ला 5,000mAh ची दमदार बॅटरी मिळेल. जी 20W च्या फास्ट TurboPower चार्जिंगला सपोर्ट करेल.

Moto G62 5G

ट्रिपल रियर कॅमेरा-

मोबाईलच्या (Moto G62 5G) कॅमेरा स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोन ला ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध आहे. यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा , 8MP हायब्रीड अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Motorola Moto G62 5G ची किंमत 17999 रुपये असू शकते.