औरंगाबाद | देशात वाढती महागाई व इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे.यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत सापडली आहे. या वाढत्या महागाविरोधात युवक काँग्रेसच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्वतः सायकल चालवत आंदोलनात सहभाग नोंदवला.
शहागंज ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उंट व सायकली घेऊन सहभागी झाले होते. यामुळे बराच वेळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
देशात सगळीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी शहरात निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतानाही या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याबरोबरच सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडाला होता.