अमरप्रीत चौकात उड्डाणपूल करण्याची खासदार इम्तियाज यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ ऐवजी शहरातील अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावे यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. दोन वर्षापूर्वी सुद्धा तत्कालीन प्रकल्प संचालक पी. डी. गाडेकर यांना सविस्तर माहिती देऊन उड्डाणपूल बांधण्याची प्राथमिकता निर्देशांकआणून दिली होती.

पत्रात नमूद करण्यात आले की, 2015 मध्ये सर्विस रस्ते, पथकांसह बांधण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामध्ये विविध ठिकाणी उद्यानातून सायकल ट्रॅकचा समावेश करून सुमारे 400 कोटीचा निधी जाहीर करण्यात आला होता. परंतु सध्या स्थितीत फक्त 70 कोटी इतक्या कमी व मर्यादित मान्यता देण्यात आली आहे.

त्यामधून सर्विस रोड, सायकल ट्रॅक इत्यादी सुविधा वगळण्यात आलेले आहे. औरंगाबाद शहराचे सध्याचे वस्तुस्थिती लक्षात घेता, चिकलठाणा विमानतळा ऐवजी अमरप्रीत चौकात उड्डाणपूल बांधण्यात यावा. मुख्य बाजारपेठ कडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे येथे उड्डाणपुलाची आवश्यकता आहे असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Comment