लॉकडाऊनमध्ये सरकार विरोधात खा. जलील काढणार मोर्चा

औरंगाबाद : येत्या 30 मार्च ते8 एप्रिल दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता,जीवनावश्‍यक वस्तूं खरेदीसाठी काही काळ सूट देत, औरंगाबाद जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. याच लॉकडाऊन मधील प्रशासनाच्या काही बाबींना विरोध करीत जिल्ह्यातील रुग्णांलयामधील डॉकटर,व स्टाफच्या रिक्त जागा त्वरित भरण्यातयाव्यात यासह विविध मागण्यासाठी खासदार इम्तियाज जलील 31 मार्च रोजी पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढणार आहेत.

या मोर्चामध्ये लहान-मोठे दुकानदार, फळ -भाजी विक्रेते, कामगार यांना घेऊन मोर्चा काढणार आहे विशेष म्हणजे 31 मार्च रोजी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन आहे. त्या मध्ये हा मोर्चा काढण्यात येत आहे .

रिकाम्या जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या नाही तर येत्या काळात त्रिव आंदोलन छेडण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like