‘मोदी बाबू, GDP बेकाबू!’ तृणमूल खासदार नुसरत जहाँने खोचक ट्विट करत मोदींना केलं लक्ष्य

नवी दिल्ली । GDP आकडे जाहीर झाल्यापासून मोदी सरकारला टीकेला सामोरं जावं लागत आहे. गेल्या ४ दशकात पहिल्यांदाच GDPमध्ये उणे घसरण झाल्यानं विरोधकांकडून मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांना यासाठी जबाबदार ठरवलं जात आहे. अर्थव्यवस्था बिकट स्थितीतून जात असतानाच सरकारनं काही चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही मुद्यांवरून तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“आता ना पबजी पुनरुज्जीवित होणार आहे, ना अर्थव्यवस्था. श्री नरेंद्र मोदीजी आता आम्ही काय करायचं? मोदी बाबू जीडीपी बेकाबू,” असं ट्विट करत नुसरत यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.

जीडीपीचे आकडे जाहीर झाल्यानंतर सीमेवर चिनी सैन्यान घुसखोरी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. चीनकडून आगळीक केली जात असतानाच केंद्रानं राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांच्या गोपनीयेतला धोकादायक असलेल्या चिनी ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पबजीसह ११८ चिनी अॅप बंद करण्यात आले असून, नुसरत जहाँ यांनी ट्विट करून टीका केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

You might also like