कोणाकोणामध्ये आणि कशी लढत होणार याचे चित्र स्पष्ट
राजकीय प्रतिनिधी
देशभरात लोकसभा निवडणुका आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या प्रचाराचा ज्वर चढत असतानाच पहिल्या टप्प्यासाठीच्या मतदानाची वेळ जवळ आली आहे. येत्या ९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून ११ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासोबतच बहुतेक सर्वच पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये कुणाकुणामध्ये आणि कशी लढत होणार याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.
राज्यात दुरंगी लढती खालील मतदार संघात रंगणार आहेत.
१. धुळे
भाजप चे सुभाष भामरे विरुद्धा
काँग्रेसचे कुणाल पाटील.
२. नागपूर
भाजप चे नितीन गडकरी विरुद्ध
काँग्रेसचे नाना पटोले
३. कल्याण
शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विरुद्ध
राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील
४. मुंबई उत्तर
भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध
काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर
५. मुंबई उत्तर पश्चिम
शिवसेनेवे गजानन कीर्तिकर विरुद्धा
काँग्रेसचे संजय निरुपम
६. मुंबई उत्तर मध्य
भाजपच्या पूनम महाजन
काँग्रेसच्या प्रिया दत्त
७. शिरूर
शिवसेनाचे – शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध
राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे
८. अहमदनगर
भाजपचे सुजय राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध
राष्ट्रवादीचे संग्राम जगताप