संसदेत फोनवर पॉर्न पाहताना पकडला गेला खासदार, नंतर याबाबत दिले विचित्र स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनता त्यांचे प्रतिनिधी निवडते आणि त्यांना संसदेमध्ये पाठवते जेणेकरून ते सर्वात शक्तिशाली टप्प्यावर आपला आवाज बनू शकतील, परंतु काही वेळा काही खासदार असे काहीतरी करतात की, त्यांना नंतर लाज वाटली पाहिजे. थायलंड (Thailand) च्या संसदेतही अशीच एक बाब दिसून आली आहे. येथे संसदेत बसून मोबाइलवर आक्षेपार्ह छायाचित्रे पाहताना एक खासदार कॅमेरयत कैद झाला. नंतर यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी ते मान्य केले पण त्यामागे अगदी विचित्र कारणही दिले.

गुरुवारी थायलंडच्या संसदेत या अर्थसंकल्पावर चर्चा होणार होती. सर्व खासदार अर्थसंकल्पातील कागदपत्रे पाहण्यात व्यस्त होते. यावेळी खासदार रोनाथेप अनुवत हे आपल्या फोनवर काहीतरी वेगळं करण्यात व्यस्त होते. प्रेस गॅलरीत बसलेल्या पत्रकारांनी त्यांचे फोटो घेतले आणि झूम केले असता त्यांना असे आढळले की, ते महिलांचे आक्षेपार्ह छायाचित्रे पाहत आहेत. यावेळी त्यांनी आपल्या चेहऱ्यावरचा मास्क देखील काढून टाकला होता. ते बराच वेळ त्या फोटोंकडे पाहत होते, ज्यामध्ये एका फोटोमध्ये एक टॉपलेस महिला होती, दुसर्‍या फोटोमध्ये एक महिला न्यूड असून पलंगावर पडून होती. नंतर पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता सत्ताधारी पलांग प्राखरथ पक्षाचे चोनबुरी प्रांताचे खासदार लज्जित झाले. मात्र, त्यांनी कबूल केले की, आपण मोबाइलवर आक्षेपार्ह छायाचित्रे पहात होतो. परंतु त्यांनी असा दावा केला की, कोणीतरी त्यांना पैसे आणि मदतीसाठी ही छायाचित्रे पाठविली आहेत. खासदार म्हणाले की, “त्या छायाचित्रांमधील पार्श्वभूमी काळजीपूर्वक बघितली तर ती मुलगी कोणत्याही संकटात आहे का हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करीत होतो. तसेच त्या मुलीच्या आसपासच्या गोष्टी देखील पहात होतो.”

‘त्या’ मुलीबद्दल वाटली भीती
ती मुलगी गुंडांच्या ताब्यात असू शकते अशी भीती वाटली असल्याने ते काळजीपूर्वक ती छायाचित्रे पहात असल्याचे खासदाराने सांगितले. ते म्हणाले की,” नंतर मला समजले की, मुलगी पैसे मागते आहे, म्हणून त्यांनी ती छायाचित्रे मोबाईलवरून डिलीट केली.” हे प्रकरण माध्यमांसमोर आल्यानंतर सरकारने त्यांच्याकडून जाब विचारला आहे. 2012 मध्ये बँकॉकचे खासदार नट बनडाटन यांनाही घटनादुरुस्ती दरम्यान पॉर्न पाहताना पकडले गेले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like