व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मात्र हे वेळापत्रक अंदाजित असून परीक्षेच्या प्रस्तावित तारखेमध्ये बदलही होऊ शकतो असं आयोगाने म्हंटल आहे.

या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक विद्यार्थ्यांना https://mpsc.gov.in/ या साईटवर जाऊन पाहता येणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर, ७ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर आणि ९ ऑक्टोबर या ४ दिवशी होणार आहे. तसेच याचा निकाल अंदाजे जानेवारी २०२४ मध्ये लागू शकतो .

महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा , महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १४ ऑक्टोबर २०२३ ला होईल. महाराष्ट्र विद्युत यांत्रिक अभियात्रिको सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर २०२३ ला होईल. सहायक नियंत्रक मापन सहायक नियंत्रक धमाल शास्त्र मुख्य परीक्षा २१ ऑक्टोबर २०२३ ला होईल. तर अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २८ ऑक्टोबर २०२३ ला होईल. वनसेवा मुख्य परीक्षा ४,५,६,७ नोव्हेंबर २०२३ ला होईल.