PSI होण्याचे स्वप्न राहिले अधुरे, विद्यार्थ्याचे हृदयविकाराने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना : हॅलो महाराष्ट्र – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या मृत विद्यार्थ्याचे नाव अशोक सोनाजी घुले असे आहे. ही घटना जालना जिल्ह्यातील आंबा या ठिकाणी बुधवारी दुपारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अशोकचे पोलिस उपनिरीक्षक व्हायचे स्वप्न होते. मात्र त्याचे स्वप्न अपुरेच राहिले आहे. हे स्वप्न वास्तवात येण्यापूर्वीच तो जग सोडून गेला आहे. आंबाचे सोनाजी घुले यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांच्या दोन मुलांपैकी अशोक हा गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता.

काही दिवसांवर परीक्षा आली होती. मात्र गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही परीक्षा रद्द होईल का? याची चिंता अशोकला सतावत होती. तो काही दिवसांपूर्वीच आंबा या आपल्या गावी आला होता. बुधवारी वडिलांना शेतात मदत करण्यासाठी तो गेला होता. दुपारी त्याच्या छातीत अचानक वेदना होऊ लागल्या. त्यानंतर तो एका झाडाखाली बसला. तिकडेच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment