कु. आकांक्षा विरकर हिला राज्यपालांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

माण तालुक्यातील सुपुत्र, माण- खटाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मिरा भाईंदर व नागोबा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकरभाई विरकर यांची कन्या व नागोबा फाउंडेशनच्या ट्रस्टी कु. आकांक्षा विरकर यांना राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई येथील सागा फिल्म्स  फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण सोहळा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी दि. 16 एप्रिल रोजी राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार सुधाकर श्रुंगारे, सागा फिल्म्स फाउंडेशनचे संस्थापक सागर धापटे- पाटील यावेळी उपस्थित होते.

कु. आकांक्षा विरकर हिला सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कु.आकांक्षा विरकर हिने कुंटुंबियासोबत हा पुरस्कार राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.
माणदेशी कन्या व सामाजिक कार्यकर्त्या कु. आकांक्षा शंकर विरकर हिच्या बरोबर महाराष्ट्रातील अनेक नामवंत व किर्तीवंत लोकांना पुरस्कार प्रदान केले आहेत.

तीस जणांचा राज्यपालांच्या हस्ते गाैरव

भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील, हास्य अभिनेते भाऊ कदम, सूत्रसंचालक व निवेदिका डॉ. समीरा गुजर, किर्तनकार ह. भ. प. सुदामभाऊ गोरखे कान्हा गुरुजी (जीवन गौरव), समाजसेविका डॉ. आयुषी देशमुख, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी अंकिता डोळस सोमणे, समाजसेविका अनघा बंडगर, डॉ. स्वागत तोडकर, माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पत्रकार रेखा खान, इस्कॉन राजगडचे सुंदर प्रभुजी याच्यासह 30  जणांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.