महावितरण विभागाचे वरिष्ठतंत्रज्ञ ऑनड्युटी तर्राट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | महावितरण विभागाचे वरीष्ठ तंत्रज्ञ येथील ऑन ड्युटी मित्रांसोबत दारू व मटणाचा ताव मारतानाचे छायाचित्र समोर आले आहेत. परमेश्वर दाभाडे हे एमएसईबीचे वरिष्ठ तंत्रज्ञ आहेत.

नक्षत्रवाडी, शाखा गोलवाडी छावणी उपविभाग येथील कार्यालयात कार्यरत आहेत. गोलवाडी सबस्टेशन येथे मित्र सहकाऱ्याला सोबत घेऊन दारू व मटणाचा आस्वाद घेताना वरिष्ठ तंत्रज्ञ परमेश्वर दाभाडे हे दिसत आहेत. परमेश्वर दाभाडे यांचे सेकंड शिफ्ट चालू असताना ऑनड्युटी ही घटना रात्री आठ वाजता घडली.

आपले कर्तव्य सोडून सरकारी नोकरीचा उपभोग घेताना दिसत आहेत.
महावितरणातील कर्मचाऱ्यांचे काम हे कठीण असते. ऑनड्युटी कार्यालयातील एखादी कार्यालयातील काम नशेत केले तर कुठलाही अपघात घडू शकतो.महावितरण सेवेतील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. त्यांचे काम महत्वाचे असते. मात्र कार्यालयीन वेळेत महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ दारू पिऊन तर्राट झालेले दिसत आहेत.

Leave a Comment