एकनाथ शिंदे- अंबानी भेट; रात्री उशिरा दोघांत तासभर खलबतं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, उद्योगपती मुकेश अंबानी यांची भेट घेतली. रात्री उशिरा वर्षावर झालेल्या या भेटीत दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. यावेळी मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते.  या भेटीने चर्चाना उधाण आले आहे.

शनिवारी रात्री उशिरा मुकेश अंबानी आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. जवळपास तासभर खलबते झाल्यानंतर १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना दिसले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. यापूर्वी गणेशोत्सव काळात मुख्यमंत्री शिंदे-आणि अंबानी यांची भेट झाली होती. गणेशोत्सव निमित्ताने शिंदे यांनी अंबानी यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. त्या पाठोपाठ आता अंबानी- शिंदे भेट झाल्याने आता चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे आणि अंबानी यांची भेट ही राज्यातील प्रकल्पांच्या दृष्टीने असल्याचे सांगितले जात आहे.