Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : बाजारातील चढ-उतारा दरम्यान, सरकारी मालकी असलेल्या ऑइल इंडियाने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न दिला आहे. BSE वर गुरुवारी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 297.15 रुपयांवर बंद झाले होते. आज इंट्रा-डे ट्रेडमध्ये या शेअर्सने पुन्हा एकदा 306 रुपयांची पातळी गाठली.

यावाढीमुळे आता ऑइल इंडियाचे शेअर्सही मल्टीबॅगर रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या कॅटेगिरीमध्ये आले आहेत. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्समधून गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न मिळाला आहे. Multibagger Stock

Oil India Limited Duliajan Recruitment 2021 - 01 Director Vacancy, Latest  Job Openings - Sentinelassam

ज्या दरम्यान ऑइल इंडियाच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्के रिटर्न दिला, त्या काळात 30 शेअर्सचा सेन्सेक्स केवळ 5.77 टक्क्यांनी वाढू शकला. त्याचे शेअर्स आणखी वाढतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. ऑइल इंडियाचे शेअर्स एका महिन्यात 38.02 टक्क्यांनी आणि या वर्षाच्या सुरुवातीपासून 50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. Multibagger Stock

Rs 5 to Rs 112: This penny stock turned into a multibagger in one year -  BusinessToday

HDFC सिक्युरिटीजने ऑइल इंडियाला ‘BUY’ रेटिंग दिले आहे. ब्रोकरेजच्या म्हणण्यानुसार, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीच्या ऑपरेटिंग नफ्यात वाढ होऊ शकते. एचडीएफसी सिक्युरिटीजने 300 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

त्याच वेळी, आणखी एक ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने या आठवड्याच्या सुरुवातीला ऑइल इंडियाला 350 रुपयांची टार्गेट प्राईस दिली होती. याशिवाय ट्रेंडलिनने 333 रुपयांचे टार्गेट दिले आहे. हे सध्याच्या किंमतीपेक्षा 12 टक्के जास्त आहे. Multibagger Stock

Oil India Limited-Uttar Pradesh - Company CSR Profile

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 120 च्या पुढे गेल्या आहेत. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही महिन्यांपासून तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होते आहे. ज्याच्या परिणामी ऑईल इंडियाच्या शेअर्समध्येही खूप वाढ झाली आहे. यापुढेही तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. कारण अमेरिकेतून तेलाची मागणी वाढली आहे. यासोबतच लॉकडाऊन हटवल्यामुळे चीनमध्येही पुन्हा औद्योगिक उपक्रम सुरू होतील, ज्यामुळे तेलाच्या मागणीतील वाढ जवळपास निश्चित झाली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.oil-india.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या- चांदीमध्ये आज घसरण !!! नवीन दर पहा

Kotak Mahindra Bank ने आपल्या बचत खाते आणि FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

ICICI Bank च्या कर्जावरील व्याज दरात वाढ , EMI देखील महागले

RBL Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, बँकेने FD दरात केला बदल !!!

Multibagger Stocks: ‘या’ 4 आयटी स्टॉक्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट रिटर्न !!!

Leave a Comment