हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या 2 वर्षांपासून Tata Teleservices (Maharashtra) Limited (TTML) या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देत आहे. शुक्रवारीही (10 जून) या शेअर्सने जबरदस्त उडी घेतली. हे लक्षात असू द्यात कि, 2022 मध्ये या कंपनीचे शेअर्स दबावात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून यामध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. आजही या शेअरमध्ये 9.98 टक्क्यांनी वाढ होऊन तो 140.50 रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
TTML ही Tata Teleservices ची उपकंपनी आहे. जी व्हॉइस आणि डेटा सर्व्हिस देते. काही दिवसांपूर्वीच TTML कडून इतर कंपन्यांना स्मार्ट इंटरनेट सर्व्हिस देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कंपनीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या नवीन सर्व्हिस मध्ये कंपन्यांना क्लाउड बेस्ड सिक्योरिटी सर्व्हिस आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड कंट्रोल मिळत आहे. क्लाउड बेस्ड सिक्योरिटीमुळे डेटा आणखी सुरक्षित राहतो. Multibagger Stock
दोन वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी TTML च्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील ते आज मालामाल झाले असतील. गेल्या 2 वर्षांत हा शेअर्स 2.50 रुपयांवरून 140.50 रुपयांपर्यंत गेला आहे. अशा प्रकारे, दोन वर्षांत 5,000 टक्क्यांहून जास्तीचा रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने दोन वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याला 56,20,000 रुपये मिळाले असतील. Multibagger Stock
गेल्या एका वर्षात त्यामध्ये 487 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला यावेळी 5,87,852 रुपये मिळाले असतील. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने 6.60 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने महिन्यापूर्वी या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आता 1,06,499 रुपये मिळाले असतील. हे लक्षात घ्या कि, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये हा शेअर 19.88 टक्क्यांनी वाढला आहे. Multibagger Stock
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.tatatelebusiness.com/aboutus-ttml/
हे पण वाचा :
HDFC कडून व्याजदरात वाढ !!! आता होम लोन महागणार, नवे दर पहा
SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर !!! आता FD वरील व्याजदरात होणार वाढ
PM Kisan : आता फक्त ‘ही’ अट पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार 12 वा हप्ता
Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे केले दुप्पट !!!
Gold Price Today : सोन्या- चांदीमध्ये आज घसरण !!! नवीन दर पहा