‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालवधीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दिला मोठा रिटर्न !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही महिन्यांपासून घसरण होत असलेल्या बाजारात सध्या तेजी आली आहे. मात्र या घसरणीमध्ये देखील काही कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदार देखिल नेह्मीच रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या शोधात असतात. तर आज आपण शेअर्स घेणार आहोत. त्या शेअर्सचे नाव आहे SRF Limited. 75 देशांमध्ये व्यवसाय असणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालवधीत गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. 1999 मध्ये 2.06 रुपये किंमत असलेला हा शेअर आता 2,604.90 रुपयांवर आला आहे. SRF Limited च्या शेअर्स यापुढे देखील गुंतवणूकदारांना भरपूर नफा देईल, असे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत. ब्रोकरेज फर्म असलेल्या शेअरखानने देखील याला बाय रेटिंग दिले आहे.

Srf Limited | Latest & Breaking News on Srf Limited | Photos, Videos, Breaking Stories and Articles on Srf Limited

लार्ज कॅप कंपनी असलेल्या SRF Limited ची मार्केट कॅप 77,159.38 रुपये आहे. ही कंपनी फ्लोरोकेमिकल्स, स्पेशालिटी केमिकल्स, पॅकेजिंग फिल्म्स, टेक्निकल टेक्सटाइल्स, कोटेड फॅब्रिक्स आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्स तयार करते. गेल्या 23 वर्षांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना भरपूर कमाई मिळवून दिली आहे. Multibagger Stock

महज 20 महीने में 1 लाख हुए 18 लाख, क्या आपने भी लगाए थे इस कंपनी में पैसे? - Multibagger Stocks Poonawalla Fincorp turns 1 lakh to 18 lakh in 20 months - GNT

गेल्या 23 वर्षात दिला मल्टीबॅगर रिटर्न

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, SRF Limited चे शेअर्स आज सोमवारी 2,609.45 रुपयांवर ट्रेड करत आहेत. 1 जानेवारी 1999 रोजी हे शेअर्स 2.06 रुपयांवर ट्रेड होते. तेव्हापासून यामध्ये 126,351.46 टक्क्यांनी वाढ झालीआहे. 1999 मध्ये जर कोणी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला त्यावेळी 48,543 शेअर्स मिळाले असते. Multibagger Stock

हे लक्षात घ्या कि, 13 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीकडून 4:1 या प्रमाणात बोनस शेअर्स देखील देण्यात आले आहेत. हे बोनस शेअर मिळाल्यानंतर 1999 मध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराकडे 1,94,172 शेअर्स होते. SRF शेअर्सच्या आजच्या किंमतीवर नजर टाकली तर 1,94,172 शेअर्सची किंमत आता 50.67 कोटी रुपये झाली आहे. Multibagger Stock

Multibagger Stock: Multibagger stock made crorepati, became ₹ 886, this stock worth ₹ 8.86 - Edules

पहिल्या तिमाहीत चांगली वाढ

आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंसोलिडेटिड बेसिसवर SRF Limited चा ग्रॉस-ऑपरेटिंग रेव्हेन्‍यू 3,894.7 कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 44.3 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचप्रमाणे, कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 51.8 टक्क्यांनी वाढून 678.2 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा करानंतरचा नफा देखील वार्षिक आधारावर 53.8 टक्क्यांनी वाढून 608 कोटी रुपये झाला आहे.

This multibagger stock nearly tripled shareholder's money in 1 year; do you own it? - BusinessToday

आता गुंतवणूक करणे योग्य ठरेल का ???

ब्रोकरेज फर्म शेअरखानने सांगितले आहे की, SRF Limited चे शेअर्स यापुढेही गुंतवणूकदारांना चांगला नफा देऊ शकतात. तसेच कंपनीच्या मॅनेजमेंटचे लक्ष केमिकल सेगमेंटवर असल्याचेही ब्रोकरेजचे म्हंटले आहे. तसेच येत्या 5 वर्षांत या सेगमेंटमध्ये 12,500 कोटी रुपये खर्च करण्याचा कंपनीचा मानस आहे. केमिकल बिझनेसमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने कंपनीला मोठा फायदा होईल, असेही शेअरखानचे म्हणणे आहे. त्यामुळे या शेअरला बाय रेटिंग देत त्याची टार्गेट प्राईस 2,960 रुपये ठेवली गेली आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.srf.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल, आजचा भाव पहा

‘या’ Multibagger Stock ने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!

Wipro : ‘या’ IT कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मिळवून दिले करोडो रुपये !!!

CSB Bank : 102 वर्षांच्या ‘या’ बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केले बदल, नवीन दर पहा

Multibagger Stock : गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!