‘या’ Multibagger Stock ने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला दुप्पट नफा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या वर्षभरात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न दिला आहे. अशा कंपन्यांमध्ये आता Astra Microwave प्रोडक्‍ट्सचे शेअर्स देखील सामील आहेत. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार असलेले राधाकिशन दमाणी यांनीही यामध्ये गुंतवणूक केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणातही Astra Microwave च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना अनेकदा उत्कृष्ट रिटर्न दिला आहे. Multibagger Stock

Stock watch: Astra Micro breaks out from consolidation - Dalal Street  Investment Journal

24 ऑगस्ट रोजी देखील Astra Microwave च्या शेअर्समध्ये वाढ दिसून येते आहे. ट्रेडींगच्या सुरुवातीलाच या शेअर्सने 2.50 टक्क्यांनी उसळी घेत 322.65 रुपयांची पातळी गाठली. याचा हा 52 आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. मात्र, काही वेळेतच यामध्ये प्रॉफिट बुकींग झाली. ज्यानंतर तो 316.50 रुपयांवर ट्रेड करत आहे. Multibagger Stock

DefenceAviationPost en Twitter: "Astra Microwave Products Ltd, a Hyderabad  based company with their product display at @DefExpoIndia #DefExpo2018  #DefExpo2018 #Chennai #MakeInIndia4Defence #MakeInIndia #ProudIndia  https://t.co/Z3qV1nXRgn" / Twitter

गुंतवणूकदार झाले मालामाल

Astra Microwave च्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 30 टक्क्यांची वाढ झाली आहे. महिन्याभरापूर्वी 245 रुपये किंमत असलेला हा शेअर्स आज 322.65 रुपयांवर आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये तो 80 टक्क्यांनी वाढला आहे तर गेल्या वर्षभरात या शेअर्समध्ये 100 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दरम्यान तो 157 रुपयांच्या पातळीवरून 322.65 वर पोहोचला आहे. Multibagger Stock

महज 20 महीने में 1 लाख हुए 18 लाख, क्या आपने भी लगाए थे इस कंपनी में पैसे?  - Multibagger Stocks Poonawalla Fincorp turns 1 lakh to 18 lakh in 20  months - GNT

राधाकिशन दमानी यांचा किती हिस्सा ???

Astra Microwave च्या एप्रिल-जून 2022 च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार राधाकिशन दमाणी यांच्याकडे कंपनीचे 8,96,387 शेअर्स किंवा 1.03 टक्के हिस्सा आहे. मार्च तिमाहीतही दमाणी यांच्याकडे इतकाच हिस्सा होता. यावरून असे दिसून येते की, दमानी यांचा या स्टॉकवर विश्वास आहे आणि त्यांनी आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत त्यांमध्ये बदल केलेले नाहीत. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.astramwp.com/

हे पण वाचा :

Train Cancelled : आजही रेल्वेकडून 154 गाड्या रद्द !!! अशाप्रकारे तपासा ट्रेनचे स्टेट्स

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, आजचे नवीन दर पहा

Multibagger Stock : ‘या’ पेपर कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात दिला 160 टक्के नफा !!!

Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये एका वर्षासाठी फ्री कॉलिंग सोबत मिळवा 24GB डेटा !!!

Aadhar Card संबंधित कामे करण्यासाठी देशभरात उघडली जाणार 114 आधार सेवा केंद्रे