‘या’ Multibagger Stock मध्ये फक्त 15 हजार रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे गुंतवणूकदार बनले करोडपती !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत भारतीय शेअर बाजाराने अनेक मल्‍टीबॅगर रिटर्न दिले आहेत. हॅवेल्स इंडियाचे शेअर्सदेखील याच कॅटेगिरी मध्ये सामील आहेत. गेल्या दोन दशकांत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न मिळवून दिला आहे. 2001 पासून गुंतवणूकदारांना या मल्टीबॅगर स्टॉकने 72,926.46 टक्के इतका रिटर्न दिला आहे. हे लक्षात घ्या कि, NSE वर 23 मार्च 2001 रोजी हॅवेल्स इंडियाचे शेअर्स 1.89 रुपयांना लिस्टेड झाले. तर काल (6 सप्टेंबर, 2022) हे शेअर्स 1,380.20 रुपयांवर बंद झाले. आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 62 टक्क्यांनी वाढला आहे.

Havells India Ltd - Finpedia

लार्ज-कॅप कंपनी असलेल्या हॅवेल्स इंडियाची मार्केट कॅप 86.35 हजार कोटी रुपये आहे. 1958 मध्ये सुरू करण्यात आलेली हि कंपनी होम अप्लायंसेस, लाइटिंग डिव्हाइसेस, एलईडी लायटिंग, फॅन, मॉड्यूलर स्विच, वायरिंग एसेसरीज आणि वॉटर हीटर्स सहित घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी अनेक उत्पादनांची निर्मिती करते. गेल्या एका महिन्यात हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये 5.82 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत या शेअर्सने गुंतवणूकदारांना 28 टक्के रिटर्न दिला आहे. मात्र गेल्या 1 वर्षात यामध्ये 4.42 टक्क्यांनी घसरण झाली आहे. Multibagger Stock

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

15 हजारांची गुंतवणूक करणारेही झाले मालामाल

लिस्ट झाल्यापासून हॅवेल्स इंडियाच्या शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना 72,926.46 टक्के रिटर्न दिला आहे. याचा अर्थ असा की, जर एखाद्याने 23 मार्च 2001 रोजी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.29 कोटी रुपये झाले असतील. Multibagger Stock

इतकेच नाही तर 23 मार्च 2021 रोजी जर एखाद्याने यामध्ये फक्त 15 हजार रुपये गुंतवले असते तर आज तो करोडपती झाला असता आणि त्याचे 15 हजार रुपये 1.09 कोटी रुपये झाले असते. गेल्या 5 वर्षात या शेअर्सने 182 टक्के रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी हॅवेल्स इंडियाच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याला 3.82 लाख रुपये मिळाले असते. Multibagger Stock

Four money tasks you should do in the new financial year 2022-23

महसूलात झाली 62% वाढ

आर्थिक वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत Havells India Limited च्या नफ्यात 3.47 टक्क्यांनी वाढ होऊन 242.43 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 234.3 कोटी रुपये होता. त्याचप्रमाणे, कंपनीचा वार्षिक महसूल देखील मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,598.2 कोटी रुपयांच्या तुलनेत 62.8 टक्क्यांनी वाढ होऊन 4,230.1 कोटी रुपये झाला आहे. Multibagger Stock

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :  https://www.havells.com/

हे पण वाचा :

Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर

EPFO : पीएफचे पैसे जमा झाले नसतील तर अशा प्रकारे करा तक्रार !!!

LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लॅन, त्याविषयी जाणून घ्या

Hallmarking of Gold : सोन्याच्या हॉलमार्किंगच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश !!!

IRCTC : ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना जेवणासहित ‘या’ सुविधा मिळतात मोफत !!!