संजय राऊतांना मुंबईत कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभा निवडणुकीवरून राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना शिवसेना नेते संजय राऊत यांना नुकतीच मुंबई कोर्टाकडून एका प्रकरणात नोटीस पाठवण्यात आलेली आहे. नोटिसीद्वारे राऊतांना समन्सही बजावण्यात आले आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनंतर त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. शिवडी कोर्टात 18 मे रोजी अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. त्यानंतर आता राऊतांना कोर्टाने नोटीस पाठवली आहे. 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांखाली छळ आणि बदमानी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शौचालय घोटाळ्याच्या आरोपांनंतर संजय राऊत यांच्याविरोधात मेधा किरीट सोमय्यांनी अब्रुनुकासनीची तक्रार मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात दिली होती.

काय आहे शौचालय घोटाळा प्रकरण?

संजय राऊतांना ज्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे ते प्रकरण म्हणजे मीरा भाईंदरमध्ये 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. यातील 16 शौचालये बांधायचे काम किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले. या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता. त्यानंतर राऊतांनी आरोप केल्यानंतर किएईत सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर कोर्टाकडून राऊतांना समन्स बजावला आहे.

Leave a Comment