व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बहिणीचा नकार बेतला भावाच्या जीवावर

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील गोरेगावजवळ आरे कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये प्रेयसीने लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराला संताप आला. यानंतर त्याने प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाचे अपहरण करुन त्याला पाण्याच्या टाकीत बुडवून त्याची निर्घुणपणे हत्या केली आहे.

काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च रोजी रात्री 7 महिन्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते, या घटनेची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली. यानंतर अपहरण करणारा आरोपी दुसरा कोण्ही नसून मोठ्या बहिणीचा प्रियकर असल्याचे समोर आले.

भांडणानंतर लग्नाला नकार
यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असता धक्कादायक माहिती समोर आली. घटनेच्या काही दिवसांपूर्वी बाळाची मोठी बहीण आणि आरोपी प्रियकर यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास नकार दिला होता. यानंतर आरोपीने रागाच्या भरात प्रेयसीच्या सात महिन्यांच्या भावाचे अपहरण करून त्याला जवळच्या कॉलेजमध्ये बांधलेल्या पाण्याच्या टाकीत फेकून दिले. यामध्ये बाळाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कन्नम मुथू स्वामी असे आरोपीचे आहे. त्याच्यावर याआधीदेखील अनेक गुन्हे दाखल आहेत.