मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लोकल ट्रेन दुर्घटनेच्या (train accident) अनेक बातम्या त्याच पद्धतीने व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आपण पाहिलेच असेल. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. ही घटना अंधेरी स्टेशन (train accident) वरील असल्याचे समोर आले आहे.
धावत्या ट्रेनमधून उतरण्याच्या नादात प्लॅटफॉर्ममध्ये अडकली महिला, घटना CCTV मध्ये कैद pic.twitter.com/qdfuyjWjcN
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) September 26, 2022
ही संपूर्ण घटना अंधेरी स्टेशन वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एका धावत्या लोकल ट्रेन मधून (train accident) एक महिला प्लॅटफॉर्मवर पडते. हे पाहून प्लॅटफॉर्मच्या राऊंडवर असलेले मुनिशंकर मिश्रा यांनी या महिलेचा जीव वाचवला.
या महिलेचा तोल जाऊन ती ट्रेन (train accident) आणि प्लॅटफॉर्मच्या मधील जागेत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुनीशंकर मिश्रा यांनी त्या महिलेला वाचवलं आणि त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने तिला स्टेशन मास्टरच्या कार्यालयात आणले. या ठिकाणी महिलेने तिचे नाव ज्योत्स्ना भरणे असल्याचे सांगितले. मात्र तिने हॉस्पिटलमध्ये जाण्यास नकार दिला आणि जाता जाता आरपीएफ अंधेरीच्या कर्मचाऱ्यांचे तिने जीव वाचवल्याबद्दल आभारसुद्धा मानले.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय