व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई आज जिंकणार का? पंजाबविरुद्ध ‘करो वा मरो’ सामना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल मध्ये डबल हेडर असून पहिला सामना गतविजेते मुंबई इंडिअन्स आणि पंजाब किंग्समध्ये होणार आहे. दोन्ही संघांना विजयाची गरज असून आजचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. मुंबई 7 व्या स्थानावर असून पंजाब 5 व्या स्थानावर आहे.

गतविजेत्या मुंबई इंडिअन्सची गाडी अद्याप रुळावर आली नसून दुसऱ्या सत्रात अद्यापही त्यांना विजय मिळवता आलेला नाही. मुंबईला सलग तीन पराभवाला सामोरे जावे लागले असून टॉप फॉर मध्ये पोचणं मुंबईसाठी सोप्प नाही. ढेपळलेली फलंदाजी ही मुंबईच्या अपयशाचे मुख्य कारण आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर मुंबईला मोठी धावसंख्या उभारावी लागेल.

दरम्यान, दुसरीकडे पंजाबलाही विजयासाठी झटावे लागणार आहे. पंजाब पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी मागील सामन्यात गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. त्यांचेही दहा सामन्यांतून आठ गुण आहेत. पंजाबमध्ये अव्वल दर्जाचे परदेशी आणि भारतीय खेळाडू आहेत पण हा संघ कधीही सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही.