Mumbai Local Train : मुंबईत उभारणार 2 नवी रेल्वे स्थानके; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Mumbai Local Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबईची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र अजूनही लोकल प्रवास करता असताना मोठ्या गर्दीला सामोरे जावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल ट्रेनचे जाळे आणखी विस्तारण्यासाठी सरकारकडून महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहेत. याचाच भाग म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण लाईनवर १० अतिरिक्त उपनगरीय ट्रेन सेवांना मंजुरी देण्याची घोषणा केली आहे. तसेच मुंबईत २ नवी रेल्वे स्थानके उभारण्यात येणार असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ? Mumbai Local Train

याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हंटल, मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी माझ्या निवेदनाला मान देत, नेरुळ-उरण-नेरुळ (4 फेऱ्या) आणि बेलापूर-उरण-बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू केल्याबद्दल तसेच तारघर आणि गव्हाण येथे स्टेशन मंजूर केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार! या निर्णयामुळे मुंबईकरांचा रोजच्या प्रवासातील मोठा त्रास कमी होईल आणि नवी मुंबई व आसपासच्या भागातील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. Mumbai Local Train

३ डिसेंबर रोजी, रेल्वे बोर्डाने पोर्ट लाईनवर एकूण दहा नवीन उपनगरीय सेवांना मान्यता दिली. तारघर आणि गव्हाण स्थानकांवरही थांब्यांना परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करणाऱ्या नेरुळ-उरण-नेरुळ मार्गासाठी चार आणि बेलापूर-उरण-बेलापूर मार्गासाठी सहा नवीन लोकल सेवांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे उरण कॉरिडॉरच्या वेगाने विकसित होणाऱ्या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत येथील लोकांना रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु अतिरिक्त सेवा आणि नवीन थांबे केवळ प्रवास आरामदायी बनवणार नाहीत तर गर्दी कमी करतील आणि नवी मुंबई आणि उरण दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद प्रवास मिळेल. तसेच आणखी एक गोष्ट म्हणजे रस्त्यांवरील वाहनांची संख्या देखील कमी होईल.