Mumbai Local Train Accident : मुंबईत मोठा रेल्वे अपघात!! प्रवाशांचा बॅगा घासल्या अन 8 जण खाली पडले

Mumbai Local Train Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train Accident । मुंबईतुन एक मोठी अपघाताची बातमी समोर येत आहे. कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. मुंब्रा स्थानकाजवळ २ लोकल ट्रेन एकमेकांजवळून जाताना लटकलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि ८ जण पटरीवर पडले. यात त्यांना जीव गमवावा लागला.

नेमकं काय घडलं? Mumbai Local Train Accident

एक लोकल ट्रेन सीएसएमटीकडे जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने दुसरी लोकल ट्रेन जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि दरवाज्या जवळील ८ जण खाली पडले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी सुद्धा झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. Mumbai Local Train Accident

या भीषण अपघातानंतर रेल्वे विभाग खडबडून जाग झालं असून रेल्वेकडून काही निर्णय घेण्यात आलेत. त्यातील पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. दुसरा निर्णय म्हणजे आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहेत. तिसरा निर्णय म्हणजे कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी लाईन तर कुर्लापर्यंत पाचवी आणि सहावी लाईन नियोजित करण्यात आली आहे. चौथा निर्णय म्हणजे ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार.

दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनमधील या अपघातानंतर (Mumbai Local Train Accident) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं. दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असं फडणवीसांनी म्हंटल.