Mumbai Local Train : आता लोकल ट्रेनचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होणार; नव्या सिस्टीमबाबत रेल्वेची घोषणा

Mumbai Local Train door closer
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाणे येथील लोकल ट्रेनच्या (Mumbai Local Train) अपघानंतर रेल्वे विभाग खडबडून जागा झाला आहे. ठाण्यात २ लोकल ट्रेन एकमेकांच्या शेजारून जात असताना दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि दरवाज्या जवळील ८ जण खाली पडले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी सुद्धा झाले. यामुळे इथून पुढे तयार होणाऱ्या नवीन रेल्वेगाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील अशी घोषणा रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे. म्हणजेच प्रवासी आत बसल्यानंतर ट्रेनचे दरवाजे आपोआप बंद होतील. यामुळे कोणीही रेल्वेच्या बाहेर फेकला जाणार नाही.

रेल्वे बोर्डाने एका निवेदनात म्हटले कि, मुंबई उपनगरीयसाठी तयार होणाऱ्या सर्व रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची सुविधा असेल. मुंबईच्या गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai Local Train) सुरक्षा सुधारणे आणि उघड्या दरवाज्यांमुळे होणारे अपघात रोखणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं. एवढच नव्हे तर सध्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर ज्या लोकल ट्रेन आहेत त्यांचीही पुनर्र्चना केली जाईल आणि या रॅकमध्ये दरवाजे बंद करण्याची सुविधा देण्यात येईल असेही रेल्वे बोर्डाने म्हंटल.

रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. मुंब्रा कलव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रेल्वे विभागाच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.. ऑटोमॅटिक दरवाजे बसवले तर ट्रेनच्या आत बसलेले प्रवासीगुदमरून मरतील असं आव्हाड यांनी म्हंटल. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दरवाजे बंद करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला. मी रेल्वेने प्रवास केला आहे, त्यामुळे मला प्रवास माहीत आहे. कारण, त्यावेळी गर्दी कमी असायची. आता, मुंबईत संध्याकाळी मेट्रोत शिरून दाखवा असं म्हणत जररेल्वेने दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला, तर लोकं गुदमरून मरतील असं राज ठाकरेंनी म्हंटल.

अपघात नेमका कसा घडला? Mumbai Local Train

आज सकाळी कसाऱ्याहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) पडून 8 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक लोकल ट्रेन सीएसएमटीकडे जात होती. तर दुसऱ्या ट्रॅकवरुन कसाराच्या दिशेने दुसरी लोकल ट्रेन जात होती. यावेळी दोन्ही लोकलमधील दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घासली गेली आणि दरवाज्या जवळील ८ जण खाली पडले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात काही प्रवासी जखमी सुद्धा झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली.