मोठी बातमी ! राज्यातील या शहरात 31 जानेवारी पर्यंत शाळा राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात ओमिक्रोन आणि कोरोनाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसरकार पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने मुंबईतील शाळांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे पहिली ते आठपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत.  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रोन रुग्णांची संख्या तब्बल 167 हून अधिक झाली आहे. दिवसेंदिवस यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकार आता सतर्क झाले असून पुढच्या पंधरा दिवसांमधील एकूण स्थिती बघूनच शाळा आणि कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले होते.

आजपासून राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अशात उद्यापासून मुंबई महापालिके अंतर्गत येणाऱ्या पहिले ते आठवी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शाळा या सुरु राहणार आहेत. मात्र शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार आहेत.

राज्यातील शाळांबाबतही निर्णय शक्य?

आजच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचाही आढावा घेतला होता. आजपासून लहान मुलांचं लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. एकीकडे आता मुंबईत शाळांबाबत जो निर्णय घेण्यात आला आहे, तशाप्रकारचा निर्णय राज्यातील इतरही जिल्ह्यांतील शाळांबाबत घेतला जातो का, याकडे राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय.

इतर महत्वाच्या बातम्या –

या’ शहरात 10 वर्ष जुन्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन रद्द; जाणुन घ्या..

आता बुट-चप्पल अन् कार यांच्या किंमती वाढल्या, ATM मधून पैसे काढण्याच्या नियमातही बदल..

कुत्र्याने 7 महिन्याच्या चिमुकल्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा; पुढे झालं असं काही..

… तर लाॅकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागणार – अजित पवार

नवरीचे 36 लाखांचे दागिने पळवणारा अखेर अटकेत; लग्नाच्या मंडपात ‘अशी’ केली होती चोरी

Leave a Comment