मुंबईतील ‘या’ गणपतींना जवळपास 100-150 वर्षांची परंपरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र | लहान मुलांपासून तर आबाल वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता उत्सव म्हणजे गणेशोत्सव होय. या उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सगळीकडे या उत्सवाची लगबग सुरु आहे. पण तुम्हाला जर खरोखर या सुंदर उत्सवाची परंपरा जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला आधुनिक मंडळांच्या भपकेबाजपणा आणि रोषणाईपासून थोडे दूर जावे लागेल. मुंबईत असे काही गणपती आहेत त्यांना जवळपास १५० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आज आपण या गणपतीबद्दल जाणून घेणार आहोत.

१) केशवजी नाईक चाळ, गिरगाव : 126 वर्षे

जेव्हा टिळकांनी पहिल्यांदा गणेश चतुर्थी एक सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात साजरी केली तेव्हा पहिल्याच वर्षी म्हणजेच 1893 मध्ये या गणपतीची स्थापना झाली. ही शहरातील पहिली सार्वजनिक गणेश पूजा आहे. मंडळाच्या उत्सव साजरा करण्याच्या पर्यावरण–पूरक पद्धतीमुळे आणि लहान गणेश मूर्तीमुळे हे मंडळ लोकप्रिय आहे.

२) मुंबईचा राजा, गणेश गल्ली : 91 वर्षे

मुंबईच्या कापड उद्योगाच्या किंवा कापड गिरण्यांच्या मुख्य भागात बसलेल्या लालबागमधील पेरू चाळीभोवताली राहणाऱ्या तरुणांनी 1928 मध्ये “लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची” स्थापना केली. लोकमान्य टिळकांनी सामान्य जनतेला एकत्र आणून या सामूहिक मंचाच्या माध्यमातून त्यांच्यात स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा उत्पन्न करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केली.

३) चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंचपोकळी : 99 वर्षे

चिंचपोकळीचा चिंतामणीची स्थापना 1920 मध्ये केली गेली. हे मुंबईतील सर्वात जुने गणेशोत्सव मंडळ आहे आणि हे मुंबईच्या सर्वात मोठ्या मंडळांपैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक मंडळ हे लालबाग मधील सर्वात लोकप्रिय मंडळांपैकी एक आहे आणि चिंतामणी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी प्रचंड संख्येने भाविक इथे येतात.

हे पण वाचा –

गणेश मंडळांसाठी खुशखबर! सवलतीच्या दरात मिळणार वीज

गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी खुशखबर

सार्वजनिक गणेशोत्सव कसा सुरु झाला…? जाणून घ्या

बाप्पाला नैवेद्य म्हणून ‘या’ सोप्या पद्धतीने बनवा ‘उकडीचे मोदक’

लोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव …

गणेशोत्सवाच्या धर्तीवर बाजारपेठा सजल्या ; साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड

कोल्हापूरकरांचे ठरले, यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच

Leave a Comment